हार्दिक पांड्याच्या एका शर्टची किंमत चक्क १ लाख रुपये ; ‘ही’ आहे खासीयत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा खेळाडू आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरत असतो. केवळ क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळेच नाही, तर मैदानाबाहेरही हार्दिक अनेक गोष्टींमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. हार्दिकचा ड्रेससिंग सेन्स कमालीचा आहे. वेगवेगळ्या शैलीचे आणि प्रकारचे कपडे घालणे हार्दिकला आवडत असते. त्यामुळे तो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो.

आपल्या कपड्यांबरोबरच अनेक ऐक्सेसरीज वापरणे देखील हार्दिक पांड्याला आवडते. पोशाख कोणताही असो, त्याबरोबर त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या आवडत्या चेन्स, पोशाखाला साजेसे गॉगल्स हार्दिकचा ‘ट्रेडमार्क’ ठरत असतात. नुकतेच त्याने एक ब्रँडेड शर्ट घातले होते. लुई व्हितॉ पॅरीस’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडचा शर्ट परिधान केला होता. हा एक रेग्युलर फिट शर्ट असून, त्यावर ब्रँडचे खास ‘लुई व्हितॉ’ प्रिंट होते. हा शर्ट लाईटवेट सिल्कचा वापर करून बनविण्यात आला असून, यावर ‘मदर ऑफ पर्ल’ बटन्स म्हणून लावण्यात आले आहेत. आता तुम्ही म्हणाल इतका भारी शर्ट असेल तर याची किंमत देखील खास असणार, तर याची किंमत देखील इतकीच महाग आहे.

दरम्यान, हार्दिकने परिधान केलेला शर्ट ‘लुई व्हितॉ’च्या वेबसाईटवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असून, वेबसाईटवर या शर्टची किंमत १,४७० डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये पाहिले तर या शर्टाची किंमत एक लाख रुपयांच्या आसपास आहे ! आता हटके स्टाईल हवी, म्हणजे कपडेही हटकेच हवेत, नाही का?

Loading...
You might also like