हार्दिक पांड्याच्या Push Ups वर फिदा झाल्या बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस, नताशानं दिला ‘असा’ Reply (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवू़डमध्ये आपल्या हॉटनेसमुळं धुमाकूळ घालणारी अभिनेत्री नताशा स्टानकोविक गेल्या अनेक दिवसांपासून लव लाईफमुळं चर्चेत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नताशाला सरप्राईज देत हार्दिकनं तिला समुद्रात बोटीवर रोमँटीक अंदाजात लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिला रिंग घालत साखरपुडा केला. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच हार्दिकनं ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी ही दिली. यानंतर दोघं सतत चर्चेत आहेत पुन्हा एक व्हिडी समोर आला आहे ज्यामुळं ही जोडी सोशलवर चर्चेत आली आहे.

हार्दिकनं त्याच्या इंसटावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो जीममध्ये पुश अप्स मारताना दिसत आहे. खास बात अशी की, तो यावेळी उडीदेखील मारत आहे जे की खूप अवघड असतं. त्याच्या या पुश अप्सवर बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि इतर काही महिला स्टार फिद्या झाल्या आहेत ज्यांनी या व्हिडीओवर कमेंटही केली आहे. खास बात अशी की, नताशानं या साऱ्यांना रिप्लाय देखील दिला आहे.

अॅक्ट्रेस संयमी खेर हिनं हार्दिकच्य व्हिडीओवर कमेंट केलीय की, हा वर्कआऊट खूप खतरनाक आहे. करिश्मा तन्ना हिनंही Wow हे तू कसं केलंस असं म्हणत कमेंट केली आहे. हे खूपच भारी अहे असं म्हणत सानिया मिर्झानंही कमेंट केली आहे.

या सगळ्यांना हार्दिकचं एवढं कमेंट करताना पाहून नताशानं देखील कमेंट करत रिप्लाय दिला आहे. बायसेप्स दाखवतानाची इमोजी तिनं कमेंटमध्ये पोस्ट केली आहे.