Hardik Pandya Yo-Yo Test | हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये खेळणार की नाही?; रिपोर्ट आला समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hardik Pandya Yo-Yo Test | भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या गेले अनेक दिवस दुखापतीमुळे मैदानापासून लांब आहे. त्यामुळे हार्दिक (Hardik Pandya) यंदाची टाटा आयपीएल खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशातच हार्दिकच्या फिटनेस टेस्टचा (Fitness Test) रिपोर्ट समोर आला आहे. (Hardik Pandya Yo-Yo Test)

 

हार्दिकला फिटनेस टेस्टमध्ये 10 षटके टाकावी लागणार होती. त्यासोबतच यो-यो टेस्ट पास (Yo-Yo Test) करायची होती, तिही 16.5 पेक्षा जास्त गुणांनी. हार्दिकने आपली यो-यो टेस्ट पास केली आहे. आता हार्दिक गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) नेतृत्त्व करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आता कुंफु पांड्या आयपीएलमध्ये Indian Premier League (IPL) गोलंदाजी करताना दिसेल. (Hardik Pandya Yo-Yo Test)

 

 

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने National Cricket Academy (NCA) भरवलेल्या फिटनेस कॅम्पमध्ये तो दाखल झाला. बीसीसीआयने (BCCI) त्याला रणजी (Ranji) खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने विश्रांती घ्यायचं ठरवलं होतं. अहमदाबादमध्येच (Ahmedabad) तो फिटनेसवर लक्ष देत होता. मात्र निवड समितीनं (Selection Committee) सांगितल्यानंतर त्याने फिटनेस टेस्ट दिली त्यात तो पास झाला आहे.

 

दरम्यान, मुंबई इंडिअन्सकडून Mumbai Indians (MI) खेळलेला पांड्या आता गुजरात संघाचं प्रतिनिधित्त्व करणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये 2 संघ आल्याने स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे.
विशेष म्हणजे गुजरात संघाचा पहिला सामना हा लखनौ सुपरजायंट्सोबत (Lucknow Super Giants) असणार आहे.
दोन्ही नवीन संघ पहिला सामना एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत.

 

Web Title :- Hardik Pandya Yo-Yo Test | hardik pandya has passed the yo yo test and hes set to bowl in ipl 2022 set to join gujarat titans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Diabetes Diet | डायबिटीजच्या रुग्णांनी सेवन करावी ‘या’ पीठाची भाकरी, ब्लड शुगर राहील एकदम नियंत्रित

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ची रुग्णसंख्या घटली, आज एकही मृत्यू नाही; जाणून घ्या इतर आकडेवारी