चौकीदाराला शोधायला मी नेपाळमध्ये जाईन, हार्दिक पटेलचं मोदींबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

अहमदाबाद : वृत्तसंस्था – मला चौकीदार शोधायचा असेल तर मी नेपाळला जाईन. मला पंतप्रधान हवा आहे. चौकीदार नको असं विधान कॉंग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलं आहे. यावरून पुन्हा वाद उफाळण्याची चिन्ह आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील ११७ लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. देशभरात दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान कॉंग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी त्यांच्या मुळ गावी विरागाम येथे सकाळी मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.