२०१५ च्या दंगलीप्रकरणी हार्दिक पटेल दोषी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बीजेपी आमदार  ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड करण्याच्या तसेच दंगल उसळवण्याच्या  प्रकरणात  विसनगर कोर्टाने हार्दिक पटेल याला दोषी ठरवले आहे. त्याला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुजरातमध्ये २०१५ला हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात सरकारी मालमत्ता आणि जीवित प्रचंड हानी झाली होती. या दंगली प्रकरणी गुजरात कोर्टाने पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेलला दोषी धरले आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b91b4a2-8fdf-11e8-bf45-493c856ed870′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  हार्दिक पटेल याला दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तसेच कोर्टाने यातील १७ आरोपींपैकी ३ जणांना  दोषी ठरविले आहे. तर १४ लोकांना आरोपातुन मुक्त करण्यात आले आहे.
२०१५ साली झालेल्या हिंसक आंदोलनात सभागी असल्या प्रकरणी हार्दिक पटेल याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गुजरात येथील मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर कोर्टाने हार्दिक आणि लालाजी पटेल यांना दोषी ठरवले आहे. या दोघांना दोन वर्षाच्या तुरुंगवासासहित ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२०१५ साली पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे याकरिता हिंसक आंदोलन करण्यात  आले होते. भाजपाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोड फोड केली होती . यावेळी रस्त्यावर येऊन देखील मोठे आंदोलन करण्यात आले होते. यात सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. हे आंदोलन हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.