उपोषणाचा तेरावा दिवस: हार्दिकची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

अहमदाबाद : वृत्तसंस्था

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. उपोषणामुळे पटेल यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज (शुक्रवार) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0073C7IIK,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e6f6ce1-b293-11e8-92e5-53f86c9e2ede’]
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह शेतकरी कर्जमाफी आणि आपला सहकारी अल्पेश कठीरिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक उपोषणाला बसले आहेत. पाटिदार समाज आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले पटेल यांच्या आंदोलनाला काॅंग्रेससह अन्य काही विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

उपोषणाचा तेरावा दिवस असतानाही आजपर्यंत गुजरातमधील भाजपाच्या एकाही नेत्याने पटेल यांची भेट घेतलेली नाही. प्रकृती अस्वस्थ्यामुळे आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे आंदोलन समिती व सरकार यांच्यातील बेबनाव उघड झाला आहे.
[amazon_link asins=’B014PHNEOW,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’153b143b-b293-11e8-89e7-13a0b4d7f61e’]

दरम्यान, पटेल यांनी आंदोलनाच्या नवव्या दिवशी मृत्यूपत्र लिहिले आहे. त्यांनीआपल्या मृत्यूपत्रात लिहीलंय की, ‘या निर्दयी भाजप सरकारविरोधात मी २५ ऑगस्टपासून उपोषण करत आहे. माझं शरीर कमजोर झालं आहे आणि मला आजार, संसर्ग झाला आहे. तब्येत ढासळत चाललेली असताना मला आता शरीरावर भरवसा राहिलेला नाही. म्हणून मी माझी अंतिम इच्छा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.’ त्यांनी आपले डोळे दान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
‘अॅट्रोसिटी’तील बदलाची सुप्रीम कोर्ट पडताळणी करणार 
मुंबई : राम कदम : जीवंत अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली
डाव्या पक्षांच्यावतीने १० तारखेला देशभर हरताळ