हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर ; “या” मतदार संघातून लढवणार निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे महाआघाडी करून काँग्रेस भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात आहे. असे असताना आता पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. यासंदर्भातली माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

गुजरातमध्ये पाटिदार समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा मानस असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल १२ मार्चला पक्षप्रवेश करण्याची शक्यता ‘पीटीआय’ने वर्तवली आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीवेळी हा प्रवेश होण्याची चिन्हं आहेत.

प्रसिद्ध चेहरे काँग्रेसची रणनीती ?  

आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी लोकप्रिय आणि चर्चेतील चेहरे उमेदवार म्हणून घेण्याकडे काँग्रेसचा कल दिसतो आहे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रेटी चेहरे  काँग्रेसमध्ये आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती. जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या ;