Hardik Patel On Congress | काँग्रेस पक्षाला रामराम केलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसला सवाल; म्हणाले – ‘भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hardik Patel On Congress | 2020 पासून गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम संभाळलेले आणि सध्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी थेट काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. ‘काँग्रेस पक्ष लोकांच्या भावना दुखावतो आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, ‘भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

 

हार्दिक पटेल ट्विटद्वारे म्हणाले की, ”मी यापूर्वीही म्हटले होते, काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचे काम करतो, हिंदू धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करतो. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असे विधान केले. मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ? तुम्ही हिंदूंचा इतका द्वेष का करता ? शतकानंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले जातेय, तरीही काँग्रेसचे नेते प्रभू श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत.” (Hardik Patel On Congress)

हार्दिक पटले यांनी आपला राजीनामा (Resigned) देताना म्हटले होते की, ”काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे, तर देशातील जनतेला विरोध नाही तर त्यांच्या भविष्याचा विचार करणारा आणि देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला पर्याय हवाय. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे असो अथवा GST लागू करणे असो, देशाला दीर्घकाळापासून यावर तोडगा हवा होता. पण, काँग्रेसने यामध्ये केवळ अडथळा म्हणून काम केले. काँग्रेसची भूमिका केवळ केंद्राला विरोध करण्यापुरती मर्यादित होती.

 

Web Title :- Hardik Patel On Congress | what is your enmity with lord rama hardik patel question to congress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा