चाहत्यांसमोर हार्दिकची मान शरमेनं खाली ; पहा व्हीडिओ

सिडनी : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा गोलंदाज हार्दीक पंड्याने महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामना खेळण्यासाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर मैदानावर सराव केल्यानंतरचा सिडनीमधील हार्दीकचा व्हीडिओ बाहेर आला आहे. या व्हीडिओत सराव करून आल्यानंतर हार्दीक चाहत्यांसमोरुन मान खाली घालून जाताना दिसत आहे.

हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे दोघे दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. तेव्हा पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’

पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचे सांगितले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली.

दरम्यान, बाहेर आलेल्या या व्हीडिओमधून हे नक्की लक्षात येत आहे की पंड्याने केलेल्या चुकीची जाणीव त्याला आहे. त्यामुळे तो चाहत्यांसमोरून जाताना शरमेने मान खाली घालून जाताना दिसत आहे.

पहा व्हीडिओ :-