Uttarakhand : मल्टिनॅशनल कंपनीचे तब्बल 288 कर्मचारी Covid-19 पॉझिटिव्ह

हरिद्वार : वृत्तसंस्था –  धर्मनगरी हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा स्फोट होण्याचा धोका आहे, कारण येथील एका मल्टिनॅशनल कंपनीतील २८८ कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कामगार वेगवेगळ्या भागात राहत होते. ते सामान्य लोकांशी संपर्कातही असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासन आता या कर्मचार्‍यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहे. याशिवाय याच कंपनीतील ४०० इतर कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, ज्यांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहता कंपनीभोवतीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. माध्यमांना माहिती देताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीतील २८८ कर्मचारी कोरोना संक्रमित आढळते आहेत. तर इतर ४०० जणांचा अहवाल येणे बाकी आहे. कंपनीच्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर या कर्मचार्‍यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या शोधासाठी १६८ लोकांची टीम कार्यरत आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु

मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील वाढत्या कोरोनाच्या समस्येबद्दल इशारा दिला आहे. आयएमएने म्हटले आहे की, देशात कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. तसेच आयएमएने म्हटले आहे की, देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. विशेष म्हणजे जगभरात अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक प्रकरणांच्या बाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र दर १० लाख लोकसंख्येत संक्रमित प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यास भारताची परिस्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे.