158 वर्षांपासून सुरू असलेल्या ‘टायटॅनिक’ जहाज बनवणाऱ्या कंपनीला अखेर ‘कुलूप’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टायटॅनिक जहाज बुडल्याची कहाणी कायमच सर्वांनी ऐकली आहे, किंवा सिनेमातून पाहिली आहे. परंतू तुम्ही हेच टायटॅनिक जहाज बनवणारी कंपनी हार्लेंड अ‍ॅण्ड वोल्फ चा बुडाल्याची बातमी ऐकली आहे. टायटॅनिक जहाज बनवणाऱ्या १५८ वर्ष जुन्या कंपनी हार्लेंड अ‍ॅण्ड वोल्फ शिपयार्ड कंपनी ही आर्थिक तोट्यात असल्याने बंद करण्याची वेळ आली आहे.

सतत तोट्यात जाणाऱ्या या कंपनीचा सोमवारी कामकाजाचा अंतिम दिवस होता. या कंपनीच्या अंदाज तुम्ही यातून बांधू शकतात कारण अखेरच्या दिवशी फक्त १२३ कर्मचारी होते. तर जवळपास १०० वर्षाआधी या कंपनी ३५ हजारहून आधिक लोक काम करत होते.

Titanic

कंपनीने या चर्चित टायटॅनिक जहाजाचे निर्माण १९०९ ते १९११ दरम्यान केले होते आणि या जहाजाला उत्तर आयर्लंडला बेलफास्टमध्ये ३१ मार्ज १९११ ला लॉन्च केले होते. 
असे असताना आपल्या पहिल्याचा प्रवासात १९१२ मध्ये टायटॅनिक जहाज हिमनगाला धडकून समुद्रात सामावून गेले. या धक्कादायक अपघातात १५१७ लोक मारले गेले. हे जहाज साऊथॅमप्टन बंदरातून न्युयॉर्कला रवाना झाला होते. टायटॅनिकचा काही भाग आणि तुकडे ७३ वर्षानंतर १ सप्टेंबर १९८५ ला मिळाले होते. याला अमेरिकी नाैदलाचे माजी कमांडर आणि समुद्र विज्ञान तज्ञ रॉबर्ट डुआने यांनी मिळून शोधले होते.

हार्लेंड अ‍ॅण्ड वोल्फ शिपयार्ड कंपनीने दुसऱ्या महायुद्धात जवळपास १५० युध्दनौका बनवल्या होत्या मात्र १९४५ नंतर कंपनी जहाज निर्मितीपासून दूर झाली, कंपनी यानंतर पानबुडी, सागरी अभियांत्रिकीशी संबंधित काही प्रकल्पांवर कम करत होती.

आरोग्यविषयक वृत्त