Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

पोलीसनामा ऑनलाईन : Harmanpreet Broke Rohit Record | भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 18 फेब्रुवारी 2023 रोजी रोहित शर्माला मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हरमनप्रीत कौर आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटर बनली आहे. या अगोदर हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. आता रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे.

काय आहे विक्रम?
हरमनप्रीत कौर जेव्हा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या गट बी लीग सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरली. तेव्हा तिचा हा 149 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.
तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 सामने खेळले आहेत.
या यादीमध्ये न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सचा तिसरा क्रमांक लागतो. तिने आतापर्यंत 140 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने टीम इंडियाचा 11 धावांनी पराभव करत गुणतालिकेत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 151 धावा केल्या होत्या.
त्यामुळे भारतीय संघाला 152 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु भारताला 5 बाद 140 धावाच करता आल्या.
या सामन्यात भारताकडून स्मृती मंधनाने झुंजार अर्धशतक केले मात्र ती भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. सध्या भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
या वर्ल्डकपमधील सर्व सामने जिंकून ऑस्ट्रेलियाची टीम क्वालिफाय झाली आहे.

Web Title :- Harmanpreet Broke Rohit Record | harmanpreet kaur broke rohit sharmas record of playing most t20 matches in t20 cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR