महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची डिग्री बोगस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय महिला टी -20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. या कारणामुळे हरमनप्रीतला बहाल केलेल्या पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एका चौकशीदरम्यान हरमनप्रीत कौरची बीए ची डिग्री बोगस असल्याचे अढळून आले आहे. त्यामुळे आता पंजाब सरकारने तिला डीएसपी पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
[amazon_link asins=’B079X2NPVF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’379f8ea2-844a-11e8-a6b0-ad3d6bf6e0f9′]

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे हरमनप्रीतला यापूर्वी रेल्वे खात्याकडून देखील नोकरी दिली गेली होती. पण तिला पंजाब पोलिसात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच यावर्षीच्या सुरुवातीलाच तिला रेल्वे सेवेतून मुक्त करण्यात आले.  आयसीसी महिला विषवचशक स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यानंतर पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतला डीएसपी पद  देऊन सन्मानित करण्यात आले होते. एका चौकशीमध्ये हरमनप्रीतची डिग्री बोगस आढळल्यानंतर आता तिला पोलिसांनी एक पत्र लिहले आहे ज्यात असे म्हंटले आहे की, “तुझं शिक्षण 12 वी पर्यंतच झालं आहे, त्यामुळे तुला कॉन्स्टेबलची नोकरी मिळू शकते,’ असं या पत्रात पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. हरमनप्रीतच्या मॅनेजरने मात्र पंजाब पोलिसांकडून असे कोणतेही अधिकृत पत्र आले नसल्याचे म्हंटले आहे. हरमनप्रीत कौरने 87 वनडे सामन्यात तिने 35.41 च्या सरासरीने दोन हजार 196 धावा केल्या आहे. तर तिने 83 टी-20 सामन्यांत 27.86 सरासरीने 1616 धावा केल्या आहेत.
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7485284d-844a-11e8-9d00-275373f127b0′]