Harmanpreet Kaur | ‘WPL’ च्या लिलावाचा सध्या तरी विचार नाही; कर्णधार हरमनप्रीत कौरचे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : Harmanpreet Kaur | महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याअगोदर खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. 13 फेब्रुवारीला हा लिलाव पार पडणार आहे. त्याअगोदर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या लिलावाबद्दल भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) विचारले असता ती म्हणाली भारतीय संघाचे पूर्ण लक्ष हे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यावर असणार आहे.
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
‘‘लिलावापूर्वी आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे आणि आमचे लक्ष केवळ या सामन्यावर आहे. आम्ही ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकण्याचे ध्येय बाळगले आहे. अन्य गोष्टी सुरूच असतात. मात्र, खेळाडूला काय महत्त्वाचे आहे किंवा काय नाही, याची कल्पना असते. आम्ही खेळाडू म्हणून परिपक्व आहोत. त्यामुळे आम्हाला कशाला अधिक महत्त्व द्यायचे याची जाणीव आहे,’’ असे हरमनप्रीत ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी झालेल्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत म्हणाली आहेत. नुकताच भारताने शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली अंडर 19 युवा महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा वरिष्ठ संघ प्रयत्न करेल असेदेखील हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली आहे. ‘WPL च्या लिलावाकडे सगळ्या खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.
कशाप्रकारे होणार सामने?
गट टप्प्यातील सामन्यांनंतर जो संघ गुणतालिकेत जो संघ टॉपला असेल तो संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये एलिमिनेटर सामना पार पडेल यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे.
या स्पर्धेतील 4थ्या व 5 व्या स्थानावरील संघ बाहेर पडतील. या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये 5 दिवस असे असतील, जेव्हा कोणतेही सामने होणार नाहीत. 17 ते 18 मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत. ग्रुप स्टेजचे सर्व सामने खेळल्यानंतर संघाना 2 दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे.
24 मार्च रोजी एलिमेंटरचा सामना पार पडेल तर 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.
Web Title :- Harmanpreet Kaur | indian womens team focus on the match against pakistan in t 20 world cup says harmanpreet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता