जर तुम्हाला वजन वाढवायचं नसेल तर ‘या’ ड्रिंक पासून ठेवा अंतर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : आपल्या सर्वांची इच्छा असते की आपण फिट दिसावे. आपले वजन नियंत्रणात असले पाहिजे. यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्नही करतो. कधीकधी आपण जिममध्ये घाम गाळतो तर कधी पार्कमध्ये धावतो. त्यासोबतच आपण एक भला मोठा हेल्‍दी डायट प्लॅन देखील बनवतो. यात हेल्‍दी फूड सोबतच ज्यूसचा देखील समावेश असतो. पुरेसे पोषण मिळविण्यासाठी आपण हंगामातील फळांचा रस पिण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपणास हे माहित असायला हवे की ज्यूस वजन वाढविण्यासाठी प्रभावी आहे.

अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की फळांचा रस जास्त प्रमाणात घेतल्यास लठ्ठपणाची भीती असते. खरं तर त्यामध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी मिळतात. संशोधनानुसार, फळांचा रस आणि साखर मिश्रित सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कॅलरीच्या बाबतीत फारसा फरक नसतो. जसे कॉर्न सिरप किंवा मध. यांमध्ये बर्‍याच प्रमाणात कॅलरी असतात. त्यांचे अधिक सेवन केल्यावर वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

एक अन्‍य संशोधनानुसार, केवळ लठ्ठपणाच येत नाही तर रोग प्रतिकारशक्ती देखील कमी होते. ज्यूस पिल्याने रक्ताच्या पातळीवरही परिणाम होतो आणि डायबिटीजचा त्वरीत परिणाम होतो. या व्यतिरिक्त डोकेदुखी, मूड स्विंग यासारख्या अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.