सावधान! अंधूक प्रकाशात वाचन करताय? करावा लागेल या समस्यांचा सामना

पोलिसनामा ऑनलाईन टीम- अनेक घरांमध्ये डिम लाइट ठेवली जाते. डिम लाइट्सना रिलॅक्सिंग मानले जाते. त्यामुळे अल्हाददायी आणि शांत वातावरण तयार होते असे सांगितले जाते. पण याच अंधूक प्रकाशात तुम्ही अथवा तुमची मुले काम अथवा वाचन करत असतील तर त्यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कमी प्रकाशात वाचण्याचे काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये अंधूकजाणवू लागतात. डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. डोकेदुखीच्या त्रासाचाही सामना करावा लागतो.

अंधूक प्रकाश असल्याने वस्तू किंवा शब्द स्पष्ट दिसावे म्हणून आपण स्क्रिनच्या दिशेने जास्त झुकतो. या स्थितीत जास्त वेळ बसून राहिल्यास मानेपासून पाठ आणि खांदे दुखू लागतात. ही स्थिती बराच वेळ राहिली तर पाठिशी निगडीत समस्या वाढू शकतात. तसेच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीराला होणाऱ्या समस्यांमुळे व्यक्तीला कामावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी येतात. मनात येणारे विचार किंवा वाचण्याच्या क्षमतेवर शारीरिक समस्यांचा परिणाम होतो. अंधूक प्रकाशामुळे डिप्रेशनचाही धोका वाढतो. अनेकदा डिप्रेशनने पीडित असणाऱ्या व्यक्तीला जास्त प्रकाश सहन होत नाही. त्यांना अंधार किंवा कमी उजेडात राहायला आवडते. त्यामुळे डिप्रेशनची समस्या आणखी वाढत जाते.