Harmful Food For Breastfeeding | ‘हे’ पदार्थ स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ठरेल अतिशय नुकसानदायक; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आईचे दूध हे लहान बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं (Harmful Food For Breastfeeding). तसेच आईचे दूध हे तान्हुल्या बाळाला अमृत समान आहे. मात्र स्तनपान देणाऱ्या महिलेला आपल्या आहारावर खासकरून लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आईसाठी सकस आहार घेणं अत्यंत महत्वाचं समजलं जाते (Harmful Food For Breastfeeding).

 

स्तनपान (Breastfeeding) देणाऱ्या महिलेला खाण्या-पिण्याच्या सवयी वर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाच असून, तिनं योग्य तो आहार (Pregnancy Diet) घ्यायला हवा. तज्ञांच्या मते, बाळाला आजारांपासून लांब ठेवायचं असेल, तर आईचं दूध दिलं पाहिजे. कारण स्तनपान करताना महिलांच्या शरीरात ऑक्सिटोक्सिन हार्माेन (Oxytocin Hormones) असतं. हे हार्मोन्स लहान बाळाच्या (Birth Baby Health) आरोग्यासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं (Harmful Food For Breastfeeding).

 

मात्र, स्तनपान (Breastfeeding Mother Diet) करणाऱ्या महिलेनं आहाराची सवय पाळणं, तितकच महत्त्वाचं असतं. तर जाणून घेऊयात स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत (This Food Can Harm For Breastfeeding Mothers) –

 

आंबट फळे (Sour Fruits) –
आंबट फळांमध्ये विटामिन सी (Vitamin C) असतं. त्यातच महत्वाचं म्हणजे विटामिन सी असलेल्या लिंबूवर्गीय (Citrus Fruits) फळांचं सेवन स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी योग्य नाही. जेव्हा एखादी आई हे फळ खाते. त्यावेळी तिच्या दुधामध्ये आम्ल तयार होण्यास सुरुवात होते. हे आम्ल दुधाबरोबर मुलाच्या शरीरात गेल्याने पोटदुखी, अतिसार आणि बाळाची चिडचिड या तक्रारी उद्भवू शकतात.

गव्हाचं सेवन करू नये (Wheat Should Not Be Consumed) –
स्तनपान चालू असणाऱ्या आईनं गव्हाचा ब्रेड (Brown Bread) खाऊ नये. कारण गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा प्रथिने असतं. ते कधीकधी नवजात बाळासाठी नुकसानदायक ठरू शकतं. स्तनपान केलेल्या बाळाच्या शौचामध्ये रक्त दिसत असेल, तर ते कदाचित ग्लुटेन इनटॉलरेंसमुळं असू शकतं. तसेच यामुळे बाळाच्या ओटीपोटात देखील वेदना होण्याची शक्यता असते.

 

कॉफी पिऊ नये (Don’t Drink Coffee) –
स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कॉफी अत्यंत हानिकारक आहे. त्यामध्ये कॅफिन (Caffeine) मुबलक प्रमाणात आढळतं.
कॅफिन बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत वाईट असतं. जास्त प्रमाणात कॅफिनच्या सेवनानं मुलांच्या पोटामध्ये त्रास होतो.

 

लसूण खाऊ नये (Don’t Eat Garlic) –
स्तनपान करणाऱ्या महिलांनी लसणाचे सेवन करू नये. लसणामध्ये एलिसीन (Allicin) नावाच्या घटकाचा वास असतो.
आई जर लसणाचे सेवन करत असेल, तर हे शक्य आहे की हा वास आईच्या दुधातही (Post Pregnancy) आढळू शकतो.
कदाचित मुलांना हा वास आवडणार नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Harmful Food For Breastfeeding | this food can farm for breastfeed mothers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती