कोरोना प्रतिबंधक लस कधी मिळणार? किती मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मागील काही दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. गतीने चाललेली लसींची मोहीम स्टॉप झाली होती. आता मात्र, आणखी लसीकरणाची मोहीम गतीने सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं दिसत आहे. याबाबत संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून देण्यात आले आहे. या महिन्यामध्ये ८ कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ८ राज्यांशी सवांद साधला. यावेळी जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा आणि तेलंगना राज्यांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जून महिन्यात ९ कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळणार असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे. तर कोरोना लसींचा साठा हळूहळू उपलब्ध होईल. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे. त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लोकांचं लसीकरण अर्धवट ठेवता येणार नाही, तसेच ३० एप्रिल रोजी राज्यांना आगामी १५ दिवसात लस मिळणार आहे. त्यानुसार १४ मे रोजी येत्या १५ दिवसात किती आणि केव्हा लस मिळेल हे सांगण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन एन्की दिली आहे.

देशातील गेल्या २४ तासातील रुग्णांची आकडेवारी –
मागील काही दिवस २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने ४ लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग २ दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या २४ तासात भारतात ३ लाख ४८ हजार ४२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब ही, कालच्या दिवसात भारतात ३ लाख ५५ हजार ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.