राष्ट्रीय

Covid-19 Vaccine : ‘मार्चमध्ये 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे व्हॅक्सीनेशन होऊ शकते सुरू’, डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना मार्चच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. लोकसभेत अजय मिश्र टेनी आणि विनोद कुमार सोनकर यांच्या पूरक प्रश्नांच्या उत्तरात डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, कोविड-19 च्या दोन लसींना आपत्कालीन वापराची मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 16 जानेवारी 2021 ला कोविड लसीकरण अभियानाची सुरूवात करण्यात आली होती आणि देशात आतापर्यंत 50 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांनी म्हटले, सध्या सात लसींवर काम सुरू आहे. यापैकी तीन लसी क्लिनिकल ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्यात आहेत. तर अन्य दोन लसी ट्रायलच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात तसेच दोन लसी प्री-क्लिनिकल टप्प्यात आहेत. कोविड लसीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील टप्प्यात फ्रंटलाईनवर राहून काम करणार्‍या दोन कोटी फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना लस देण्यात येईल.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, फ्रंटलाइन वर्करना लस देण्याचे काम 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वर्गातील लोकांना मार्चच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

फ्रंटलाइन कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचा खर्च 480 कोटी रूपये
मंत्र्यांनी सांगितले की, अंदाजे तीन कोटी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी येणारा खर्च सुमारे 480 कोटी रूपये आहे. हा खर्च पूर्ण करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना निधीचे वितरण कोविन पोर्टलवर नोंदणीकृत लाभार्थ्यांनुसार केला जात आहे.

Back to top button