हर्षा भोगलेनं निवडली ‘IPL 2020’ ची आपली टीम, ‘या’ मोठ्या नावांचा समावेश केला नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगचे 13 वे सत्र संपले आहे. मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 5 गडी राखून पराभव करत पाचव्या वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहितच्या कप्तानीत मुंबईने यंदा देखील जेतेपद आपल्या नावे केले. आयपीएलचा हा हंगाम संपुष्टात आल्यानंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू कामगिरीच्या जोरावर आपला सर्वोत्कृष्ट संघ निवडत आहेत. या दरम्यान, भारताचे क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले यांनीही आयपीएल 2020 ची आपली टीम निवडली असून अनेक मोठ्या नावांना आपल्या संघात समाविष्ट केलेले नाही.

हर्षा भोगलेने क्रिकबझच्या एका व्हिडिओमध्ये आयपीएलच्या या हंगामाची आपली टीम निवडली आहे. त्यांनी केएल राहुल आणि शिखर धवनला सलामीवीर म्हणून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तिसर्‍या क्रमांकावर हर्षा भोगले यांनी सूर्यकुमार यादवला विराट कोहलीपेक्षा जास्त पसंती दिली आहे, तर चौथ्या क्रमांकावर त्यांनी एबी डिव्हिलियर्सला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. तसेच त्यांनी कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याला आपल्या संघात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षा भोगले यांनी जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांचा समावेश केला आहे, तर त्यांच्या संघात राशिद खान आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाज आहेत.

हर्षा भोगलेने मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंचा या संघात समावेश केला आहे, तर त्यांच्याकडे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. यावर्षी पर्पल कॅप आपल्या नावे करणाऱ्या कगीसो रबाडाचे नाव हर्षा भोगले यांनी आपल्या संघात घेतलेले नाही.

हर्षा भोगले यांची आयपीएल 2020 ची टीम – केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, रशीद खान