Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Harshaali Malhotra | बॉलीवूडमधील ‘भाईजान’ सलमान खान त्याचा चित्रपट ‘अंतिम’च्या (Antim) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमान खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळतो. तसेच सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan) हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. तर रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.

‘बजरंगी भाईजान’मध्ये मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra). तिनं बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं. सध्या मुन्नी सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. तर आपल्या फोटो आणि व्हिडिओनं ती सतत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

 

सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर तिनं एक व्हिडिओ शेअर केला असून, मुन्नीचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतं. हर्षाली मल्होत्रानं (Harshaali Malhotra) शेअर केलेला व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील हाव भाव अचानक रागीट दिसून येत आहे.

तर व्हिडिओमध्ये प्रसिद्ध डायलॉग “एक्सक्यूज मी, आपसे पूछना था आप जो ये सब बोल रहे हैं उसके पैसे चार्ज करते हे या ये सब मुफ्त का ज्ञान है.” हा डायलॉग ‘जब वी मेट’ (Jab We Met) मधील करिना कपूरचा आहे.
दरम्यान, मुन्नीचा अभिनय आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केला आहे.

तसेच या व्हिडिओला जवळपास इंस्टाग्रामवर 31हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय.
शेअर केल्यानंतर तिनं “नो एडवाइज प्लीज” असं कॅप्शन मध्ये लिहिलं.
तसेच हर्षाली सोशल मीडियावर नेहमीच आपल्या अभिनयानं नेटकऱ्यांना आकर्षित करून घेते.

Web Title : Harshaali Malhotra | bajrangi bhaijaans munni aka harshaali malhotra shares the video in the style of kareena kapoor watch viral video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Liver detox foods | लिव्हर आतून स्वच्छ करून मजबूत करतील ‘या’ गोष्टी, अनेक आजार राहतील दूर; जाणून घ्या

Pune Crime | पोलिसाच्या डोळ्यात स्प्रे मारुन चाकूने हल्ला

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज