खिशात चाळीस रुपये घेऊन मुंबईत आला अन् 4 हजार कोटीचा केला घोटाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खिशात अवघे चाळीस रुपये घेऊन मुुंबईत आलेल्या हर्षद मेहता (harshad-mehta-) 1980 – 90 च्या दशकात शेअर बाजाराचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जात होता. मेहता हा अनेक कोटीचा घोटाळा करेल असे कोणाला वाटल नव्हत. त्याचा चार हजार कोटीचा घोटाळा 1992 मध्ये उघडकीस आला होता.

शेअर बाजारातील सर्वात मोठ्या घोटाळ्यासाठी कुख्यात असलेल्या हर्षद मेहताचा जन्म गुजरातमधील राजकोटमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्याचा बालपणीचे काही दिवस कांदीवलीत गेले. पुढे वडीलांची बदली रायपूरला झाल्यानंतर हर्षद कुटुंबासमवेत रायपूरला गेला. 1954 साली जन्मलेल्या हर्षदच रायपूरच्या शाळेत शिक्षण सुरु झाले.. तो शाळेत हुशार नव्हता. त्याला एकदा शाळेतून काढून टाकले होते. त्यानंतर रायपूरहून मुंबईत शिक्षण घ्यायच म्हणून खिशात अवघे 40 चाळीस रुपये घेऊन तो मुंबईत बीकॉमची पदवी घेण्यासाठी दाखल झाला. येथील लाला लजपतराय महाविद्यालयातून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.

त्यानंतर हर्षदने कपडे आणि इलेक्ट्रीक उपकरणे विकण्याची नोकरी केली. त्यानंतर त्याने न्यू इंडिया इश्युरंस कंपनीत सेल्स पर्सन म्हणून ती नोकरी स्वीकारली . प्रचंड महत्कांक्षी असलेला हर्षद कोणतीही रिस्क घ्यायला तयार असायचा. तो कोणतीही नवीन सिस्टीम तात्काळ शिकून घ्यायचा. 8 वर्ष तो ठिकठिकाणी नोकरी करत होता. याच काळात त्याला शेअर मार्केटमध्ये आवड निर्माण झाली. नंतर काही शेअर दलालाकडे काम केल्यानंतर 1984 साली मेहताने स्वत:ची स्टॉक मार्केट ब्रोकरेज कंपनी ग्रो मोर रिसर्च ॲड ॲसेट मॅनेेजमेंट सुरु केली. 23 एप्रिल 1992 दिवस त्याच्यासाठी काळा दिवस ठरला. त्या दिवशी टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजली. ती बातमी चार हजार कोटीचा घोटाळा उघड करणारी बातमी होती. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्येच ही बातमी ब्रेक केली होती पत्रकार सुचेता दलाल यांनी. अन् त्याच दिवशी हषर्द मेहता नावाचा बोलबाला झाला.

सरकारला काही कामासाठी पैसे उभा करायचे असल्यास ते बॉंडद्वारे उभे केले जातात. सर्व बॅंकाना सरकारी बॅंकामध्ये ठरावीक रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. सरकार बॉन्ड्स घेणा-या सर्वाना व्याजही देते. जेंव्हा एखाद्या बॅंकेला पैशाची गरज पडेल तेंव्हा त्या बॅंकेकडे असलेले सरकारी बॉन्ड्स ती बॅंक दुस-या बॅंकेला विकत असे अन अल्पावधीसाठी काही व्याजदराने कर्ज घेत असे. पैसे आल्यावर पहिली बॅंक तो बॉंन्ड दुस-या बॅंकेकडून विकत घेत असे. ह्याला ब्रोकींगच्या भाषेत रेडी फॉरवर्ड डील असे म्हणले जात असे. अल्पावधीसाठी लागणा-य़ा पैशासाठी या प्रकारामुळे लगेचच सोय होत असे. याचाच फायदा हर्षद मेहताने घेतला अन् 4 हजार कोटीचा घोटाळा केला.

ज्या बॅंकेला बॉन्डस विकायचे असतात, तिला ग्राहक म्हणजेच बॅंक शोधायचे काम काही ब्रोकर्स करत असतात. हर्षद मेहता हा तशाच ब्रोकर होता. हर्षद मेहताला ही सर्व सिस्टम माहिती होती. त्याने त्याचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याच झाल अस की, जेंव्हा बॅंकेला बॉन्ड विकायचा असायचा तेंव्हा मेहता मी तुम्हाला बॉन्ड घेणारी बॅंक शोधून देतो, असे सांगून बॉन्ड बॅंकेकडूून घ्यायचा. तो बॅंकेला काही दिवसाची मुदतही मागून घेत असे. परत मेहता हा बॉन्ड विकत घेणा-या बॅंकेत जात असे आणि तुम्हा विक्रेता शोधून आणतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा.परत त्या बॅंकेकडे काही दिवसाचा कालावधी मागायचा असे करत त्याने तब्बल चार हजार कोटीचा घोटाळा केला.

You might also like