हर्षवर्धन पाटलांकडून इंदापूरसाठी ‘संकल्प’ जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर विधानसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या अणूषंगाने भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आपला संकल्प, (वचननामा) जाहिरनामा मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन जाहिर केला असुन त्यामध्ये एकूण २२ मुद्यावर विकासात्मक भर देणार असल्याचे नमुद केले आहे. तर इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी व सर्वसामाण्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानुन काम करणार असल्याची माहीती भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथिल भारतीय जनतापार्टी संपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दीली.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांचेसह इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, भाजप तालुकाध्यक्ष नानासो शेंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष नितिन शिंदे, रयतक्रांती शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष निलेश देवकर यांचेसह मोठ्या प्रमाणात पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाच्या जाहिरनाम्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखा-जोखा मांडला असुन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना,निरा भामा सहकारी साखर कारखाना,इंदापूर अर्बन सहकारी बँक,खंडकरी शेतकरी, शिक्षण, महिला सबलीकरण, स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर,पंचतारांकीत एम आय डीसी अशा अनेक संस्थांच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यात आनेक विकासकामे केली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.

संकल्प वचन नाम्यामध्ये विकासाचे एकुण २२ मुद्दे मांडले असुन निवडून आल्यास पुढील सर्व मुद्यांची पुर्तता करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामध्ये इंदापूर तालुक्यात जलव्यवस्थापन करणे,कृषि व विधी महाविद्यालय सुरू करणे, लोणी देवकर पंचतारांकीत एमआयडीसीमध्ये अधिकच्या कंपण्या आणने व युवकिंच्या हाताला रोजगार देणे, तिर्थक्षेत्र पर्यटनास प्राधाण्य देणे, उजणी जलाशय भागात जल पर्यटन क्षेत्र विकसित करणे, केंद्र शासनाच्या माध्यमातुन शेतमाल प्रक्रीया उद्योगांची निर्मिती करणे, उजणी धरणात बुडीत बंधारे बांधणे, शेतीसाठी व उद्योगासाठी पुर्ण दाबाने विजपुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक जि.प. गटामध्ये शासकीय अणूदानाच्या माध्यमातुन एक गाव सौरग्राम म्हणून विकसात करणे व त्या माध्यमातुन गावे स्वावलंबी बनविणे, भारत सरकारच्या योजनेतुन विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करणे, इंदापूर शहर हे शैक्षणीक व सांस्कृृृतिक केंद्र म्हणून विकसात करणे यासह विकासाचे एकुण २२ मुद्दे मांडण्यात आले असुन जनतेने साथ दिल्यास वरील सर्व मुद्यांची पुर्तता करण्यात येणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी