केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा नवा व्हिडीओ, केले सासर्‍यांसह माजी खा. चंद्रकांत खैंरेंवर गंभीर आरोप (व्हिडीओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी करून मोठा निर्णय जाहीर केला होत. तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संसन्यास घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एक एक व्हिडीओ सोशल मीडिायावर पोस्ट केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सासरे रावसाहेब दानवे यांच्यासह शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सणसणीत आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, आता आपण डोक्याला कफन बांधले आहे. त्यामुळे आता आपण त्यांना घाबरत नसल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

 

दरम्यान, मागील वेळी हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केलं. हर्षवर्धन जाधव तेव्हा महाबळेश्वरला एका मेडिटेशन सेंटरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध प्रकारचे छंद जोपासत आहे. मीही अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. पण विनाकारण काही गोष्टी मागे पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत यांची जाणीव झाली आणि यातून राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं.