भाजप प्रवेशाची घोषणा करणार्‍या हर्षवर्धन पाटलांकडून ताबूतचं दर्शन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे)- मोहरम निमित्त इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक येथील सवारीचे दर्शन घेत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहरातील सातपुडा, शेख मोहल्ला, बागवान गल्ली, कसबा येथील ताबूतचे (डोलाचे) फुलांची चादर वाहत दर्शन घेतले. सातपुडा येथील काझी गल्लीतील ताबूत चे दर्शन घेत त्यांनी स्वतः सबिल (सरबत) बनविले व त्याचे वाटप केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.

मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन-हुसेन यांची याच महिन्यात यहुदी लोकांकडून कत्तल करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ ताबूत उभारून त्या ताबूत मध्ये हसन- हुसेन यांच्या कबरीची प्रतिकृती बनवून मोहरमच्या दहा तारखेला मुस्लिम बांधव गावातून ताबूत फिरून शेवटी विसर्जन करतात. इस्लाम धर्माची सहनशिलतेचे दर्शन घडवणारा हा मोहरम सण आहे.

यावेळी नगराध्यक्ष अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, जगदीश मोहिते, ॲड. कृष्णाजी यादव, बापू जामदार, जकिर काझी, मंगेश पाटील, रशीद पठाण, नितीन मखरे, जावेद शेख, लियाकत पठाण, अल्ताफ पठाण, शेखर पाटील, यावेळी उपस्थित होते.

 

Loading...
You might also like