Birthday SPL : ‘सूफी की सुल्ताना’चा मिळाला होता किताब ! आवाज नव्हे तर पगडीदेखील ‘या’ सिंगरची ओळख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सिंगर हर्षदीप कौर (Harshdeep Kaur) आजच्या पिढीच्या आवडत्या गायिकांपैकी एक आहे. आपल्या गोड आवाजा सोबतच ती लुक आणि आऊटफिटसाठीही ओळखळी जाते. आज 16 डिसेंबर (वार बुधवार) हर्षदीपचा वाढदिवस आहे. आज या निमित्तानं आपण तिच्या अचिव्हमेंट आणि प्रसिद्ध गाण्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

हर्षदीप कौरचा जन्म 16 डिसेंबर 1986 रोजी दिल्लीत झाला होता. म्युझिकल बॅकग्राऊंड असल्यानं वयाच्या 6 व्या वर्षापासून तिची संगीताची तालीम सुरू झाली. स्टार प्लसवरील रिॲलिटी सिंगिंग शो द वॉईस मध्ये ती कोच म्हणून दिसली होती. 2008 साली तिनं जुनून कुछ कर दिखाने का हा सिंगिंग कम्पीटीशन शो जिंकला होता. यात ती तिचे गुरू मास्टर राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सोबत सूफी की सुल्तान जॉनरसाठी कंपीट करत होती. हा किताब जिंकल्यानंतर तिला सूफी की सुल्ताना चा किताब देण्यात आला. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी तिला हा अवॉर्ड दिला होता. ते शोच्या ग्रँड फिनालेचे गेस्ट होते.

सूफी गाण्याचं सादरीकरण करताना हर्षदीपनं एक स्पेशल सूफी अटायर घातला होता. यात तिच्या पगडीचाही समावेश होता. तेव्हापासून आतापर्यंत तिची ही पगडी तिच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

रंग दे बसंती पासून तर राजी पर्यंत हर्षदीपनं गायली ही हिट गाणी
हर्षदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2003 साली तिनं पहिलं बॉलिवूड गाणं गायलं होतं. रंग दे बसंतीमधील एक ओंकार, टॅक्सी नंबर 9211 मधील उडने दो, बँड बाजा बारात मधील वारी बरसी, देसी बॉईज मधील झक मार के, रॉकस्टारमधील कतिया करू, कॉकटेलमधील जुगनी, जब तक है जान मधील हीर, राजी सिनेमातील दिलबरो, मननर्जियां सिनेमातील नोंच लडाईयां, पंगामधील ले पंगा ही गाणी तिनी गायली आहेत.