‘सासरे’ रावसाहेब दानवेंवर ‘जावई’ हर्षवर्धन जाधवांचे ‘गंभीर’ आरोप

कन्नड : पोलीसनामा ऑनलाइन – कन्नड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीवरून भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रावसाहेब दानवे यांनी चकवा दाखवत कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा आरोप जावई हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आरोप करत टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांनी माझे पंचायत समितीचे सदस्य फोडले. सभापतीच्या निवडणुकीत माझ्या स्वतंत्र असलेल्या रायभान जाधव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना रुबेना कुरेशी यांना सभापती तर बनकर यांना उपसभापती पदावर निवडून देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यातील चार सदस्य भाजपने पळवून नेले. भाजपनं स्वत:च्या एकाला सभापती केले. हा प्रकार घृणास्पद असून यावरून भाजपची मस्ती अजून जिरलेली दिसत नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, या सगळ्या घटनाक्रमांमध्ये जालन्याचा चकवा असल्याचे मला स्पष्ट जाणवत आहे. कारण त्यांनी सहभाग घेतला नसता, तर ही चार माणसं कधीच गळाला लागली नसती. घरातूनच द्रोह झाल्याचे स्पष्ट मत असल्याचे जाधव यांनी सांगितले. या आरोपाचे रावसाहेब दानवे यांनी खंडन केलं, तरी रायभान जाधव कुटुंबाला आणि कन्नड तालुक्यातील जनतेला चकवा दिलेला आहे, असा आरोप त्यांच्यावर हर्षवर्धन जाधव यांनी केला. तर मी चुकीचं काहीही केलं नाही, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे जावई आणि सासरे यांच्यातील वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?