Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Harshvardhan Patil | आज पुण्यात रामभाऊ बराटे मित्र परिवारातर्फे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती (बांधकाम व आरोग्य) स्व. रामभाऊ बराटे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि माजी आमदार उल्हास पवार (Ulhas Pawar) उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सध्याच्या राजकारणात शिरलेल्या प्रवृत्ती उघड केल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या राजकारणात (Maharashtra Political News) कोण कुठे असेल, ते सांगता येत नाही. आज कोणत्या पक्षात आहे, ते पहावे लागते. उद्या कोणत्या पक्षात असतील, ते माहिती नसते. कोणाला जर शुभेच्छा दिल्या, तरी त्याला राजकारण समजले जाते. नेमके कशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत, ते समजत नाही. पण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल, तर तो आज केला जातो.

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, पूर्वीचे राजकारण आता राहिले नाही. आम्ही १९९०-९२ च्या साली राजकारणात नव्या दमाचे लोक आलो तेव्हा राजकारणात कोणी कोणत्याही पक्षाचे असले तरी प्रत्येकाला योग्य तो मान दिला जात असे. पण आता मात्र एकमेकांवर आरोप केले जातात. जिल्हा परिषदेमध्ये देखील वातावरण बदलले आहे. रामभाऊ बराटे यांनी ज्या विचारांनी राजकारण केले, त्या विचारांची आज गरज आहे.

तर माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, अप्पासाहेब शिवतरे हे जेव्हा सभापती होते, तेव्हा ते काम झाले की जिल्हा
परिषदेची गाडी कार्यालयात लावत असत आणि पायी किंवा सायकलवर ते घरी जात. त्यांनी सर्व काम समाजासाठी केले.
आज ते पहायला मिळत नाही. रामभाऊ बराटे यांचे देखील मोठे योगदान आहे.
त्यांच्या स्मृती जपण्याचे काम त्यांचे मित्र करत आहेत.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तर कीर्तनकार
हभप चंद्रकांत वांजळे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षवर्धन पाटील आणि
माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे,
माजी आमदार संभाजी कुंजीर, बापूसाहेब पठारे, विकास दांगट पाटील आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार

तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना

RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल

फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना

Pune Pimpri Crime News | गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड परिसरातून अटक, गुन्हे शाखेकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार