काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून पराभूत

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर मतदार संघातून भाजपाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा 3110 मतांनी पराभव झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली होती. मागील निवडणुकीतही दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. दत्तात्रय भरणे यांना 114960 आणि  हर्षवर्धन पाटील यांना 111850 मते मिळाली आहेत.

जागावाटपाविषयी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या मतभेदांमुळे हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांनी 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्ष आणि त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

 

Visit : Policenama.com