माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी, ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि.15) अटक (Arrest) केली. बुधवारी (दि.16) त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर आज (शुक्रवारी) पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी (Magistrate Custody) सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात (Yerwada Jail) करण्यात आली. बचाव पक्षाचे वकील झहिर खान पठाण यांनी आज सुनावणी पारपडल्यानंतर याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

सध्या हर्षवर्धन जधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यातील दुसरा महत्त्वाची मुद्दा म्हणजे यातील महिला आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. परंतु गुरुवारी त्यांना अंतरिम जामिन मिळवून दिला आहे. त्यामुळे त्या फरारी नसून याच ठिकाणी असल्याचे पठाण यांनी सांगितले. जाधव यांची पोलिस कोठडी आज पूर्ण झाली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले.

हर्षवर्धन जाधव यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांची पोलीस कोठडीची मागणी राखून ठेवण्यात आली. मात्र त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आम्ही जामिन अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिल आणि आयओ यांचे म्हणणं मांडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आम्हाला म्हणण मांडण्यासाठी मुदत हवी असल्याचे त्यांनी सांगितलं. परंतु न्यायालयाने त्यांना उद्याच म्हणण मंडण्यास सांगितलं. जर उद्या म्हणणं मांडलं नाही तर उद्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यात येईल, असेही पठाण यांनी यावेळी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एक चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा घडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी गाडीत बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर जाधव आणि इशा झा यांनी चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी हर्षवर्धन जाधव यांना अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले.