काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटलांनी कुटुंबासह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजयकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनाइन – लोकसभा निवडणुकीत युतीने यश मिळवल्यानंतर इतर पक्षातील नेते युतीमध्ये येण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी युतीमध्ये प्रवेश केला आहे. काहीजण काही तरी कारणांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच पुणे जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी पाटील परिवाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यातील राजकीय कलह वाढले आहेत. त्यातच पाटील यांनी निमंत्रण देण्याच्या बहाण्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजयकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंकिता पाटील यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या लिखीत ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रीत केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगेच हे निमंत्रण स्विकारले व संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल माझे अभिनंदन केले, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –