उड्डाण करताच ‘पक्षी’ धडकल्याने जग्वार विमानचे ‘एर्मजन्सी’ लॅडिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणात गुरुवारी सकाळी वायू दलाचे जग्वार विमानाचा अपघात झाला. हे लढाऊ विमान अंबाला एअरफोर्सच्या स्टेशन वरुन उडाले होते, मात्र ह्या विमानाने उड्डाण करतातच एक पक्षी या विमानाला येऊन धडकला. त्यानंतर या विमानाची इमरजन्सी लॅन्डिग करण्यात आली. यानंतर हे विमान रिहायशी विभागात कोसळले. यात कोणतेही जीवितहानी झाल्याचे अजून तरी समोर आले नाही.

अशाच प्रकारचा अपघात या आधी देखील झाला होता. ज्यात गुजरातमधील कच्छ जिल्हात एक जग्वार लढाऊ विमान कोसळले होते. या विमानाने जामनगर येथून उड्डाण केले होते. या अपघातात वैमानिक संजय चौहान शहीद झाले होते. संजय चौहान वायूदलात एअर कमांडर पदावर होते. जग्वारने रुटीन ट्रेनिंग मिशन दरम्यान जामनगरमधून १०.३० वाजता उड्डाण केले होते. विमान अपघात एवढा भयानक होता की त्यांचे तुकडे बऱ्याच अंतरावर उडून पडले होते.

कुशीनगर येथे देखील झाला होता विमान अपघात –
काही महिन्यांनंतर जग्वार विमानबरोबर झालेली ही दुसरी घटना आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तरप्रदेशात कुशीनगर मध्ये वायू दलाचे फायटर विमानाची दुर्घटना झाली होती. परंतू समाधान बाब ही होती की या अपघातात वैमानिकाचा जीव वाचला होता. हे विमान कोसळताच विमानाने पेट घेतला होता. या विमानाने गोरखपूर एअरबेसवरुन उड्डाण केले होते.

आरोग्य विषयक वृत्त-
छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’
वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट ला अनेकांची पसंती
चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

Loading...
You might also like