सिरसामध्ये भाजपा विरोधी उमेदवार गोपाल कांडाचा प्रचार करणार सपना चौधरी, BJP मध्ये प्रचंड खळबळ

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणा निवडणुकीच्या आधी भाजपामध्ये दाखल झालेली गायिका आणि डांसर सपना चौधरी हिने सिरसाचे भाजपविरोधी उमेदवार आणि हरियाणा लोकहित पक्षाचे नेते गोपाल कांडा यांच्यासाठी प्रचार करण्याची घोषणा केली आहे. याविषयी तिचा व्हिडिओ संदेश व्हायरल होत आहे. सपनाच्या या निर्णयाने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

कार्यक्रमाच्या जाहिरातीची फोटो व्हायरल –

सपना चौधरी हिच्या सिरसा कार्यक्रमाच्या जाहिरातीची फोटो व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिक्का सिंगही येणार आहेत. एकीकडे भाजपा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर मनोहर सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी दबाव आणत आहे. दुसरीकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्या सपना चौधरी हिच्या या निर्णयामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते. त्या हरियाणामध्ये खूप लोकप्रिय आहे.

ट्विटरवर हरियाणा लोकहित पक्षाने शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, पंजाबी गायक मिक्का सिंग आणि सपना चौधरी सिरसा येथील हरियाणा लोकहित पक्षाचे उमेदवार गोपाल कांडा यांचे समर्थन आणि प्रचार करण्यासाठी 19 ऑक्टोबरला येत आहे.

Advt.

हरियाणा भाजपाचे दिग्गज नेते आता सपना चौधरी यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत. सिरसा सीटवरील भाजपच्या उमेदवाराला गोपाळ कांडा यांचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सपनाच्या रोड शोमुळे पक्षाला तोटा सहन करावा लागू शकतो.

भाजपने तिकीट दिले नाही –

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल असा तिचा विश्वास होता. सपनानेही तिकिटासाठी दावा केला होता, मात्र तिकिट मिळाले नाही.