हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतील 42 % उमेदवार कोट्याधीश, 117 जणांवर गुन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रा सोबतच हरियाणामध्ये सुद्धा विधासभेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, 74 राजकीय पक्षांचे एकूण 1,169 उमेदवार नशीब अजमावत आहेत. 2014 ची निवडणूक 43 पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती. गेल्या विधासभेच्या मानाने यंदाच्या निवडणुकीमध्ये गुन्हेगारी असलेल्या उमेदवारांमध्ये 3 % नि वाढ झाली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी 42 % उमेदवार कोट्याधीश असून, 10 % उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. 1,138 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार 481 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 117 उमेदवारांवर गुन्हे आहेत. यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्याधीश 481 उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी 4 कोटी 31 लाख रुपये आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे 79, भाजपचे 79, जेजेपीचे 62, आयएनएलडीचे 80 आणि बसपाचे 34 उमेदवार कोट्यधीश आहेत.

117 उमेदवारांवर गुन्हे दाखल –
यावेळी 10 टक्के म्हणजे 117 उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. 70 उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे 22, भाजपचे 4, जजपाचे 16, आयएनएलडीचे 12 आणि बसपाच्या 21 उमेदवारांचा समावेश आहे.

बेरोजगारीवर भाजप गप्प का ? –
बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नावर भाजप सरकार काहीच बोलत नाही, उलट कलम 370 सारख्या मुद्द्यांना प्रचार मुद्दा बनवत आहे असा घणाघाती आरोप हरियाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी भाजप सरकारवर केला आहे. तसेच या निवडणुकीत जनता भाजपला बरोबर धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like