CM खट्टर यांच्या विरोधात JJP ने तेज बहादुर यादव यांना उतरवले विधानसभेच्या रिंगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्ष आता सज्ज झाले आहेत. गुरुवारी जननायक जनता पार्टी म्हणजेच ‘जेजेपी’ने आपली उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. ज्यात 30 उमेदवारांचा समावेश आहे. यात सगळ्यांची नजर बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यादव यांच्या उमेदवारीकडे होती. कारण तेज बहादुर यांना ‘जेजेपी’ने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात कर्नाल येथून मैदानात उतरवले आहे.

21 ऑक्टोबर 2019 ला होणार मतदान
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र्रात एकूण 288 मतदारसंघांमध्ये तर हरियाणामध्ये 90 मतदारसंघांमध्ये विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे.

Visit : Policenama.com