“काँग्रेसला त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या नावापुढे ‘पप्पू’ लावावं” 

हरियाणा : वृत्तसंस्था – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलेले आहे. चौकीदार नरेंद्र मोदी असं नाव त्यांनी केले आहे. त्यावर त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या दिग्गज नेत्यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार लावले. त्यावर आता हरयाणाचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज यांनी नाव न घेता काँग्रेस नेत्यांनाही एक सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलण्याचा सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांने दिला आहे.

आम्ही आमच्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ लिहिले आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीही आपल्या नावाआधी ‘पप्पू’ लिहू शकता, असा टोला अनिल विज यांनी लगावला आहे. आम्हाला काहीच आक्षेप नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदींसारखे आपल्या नावापुढे चौकीदार लावले आहे. त्यामुळे त्यावरून त्यांच्या या ट्रेंडवर टीका होत आहे. त्यामुळे विज यांनी काँग्रेस नेत्यांना नावापुढे पप्पू लावण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, अनिल विज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना ‘निपा व्हायरस’ म्हणून संबोधले होते.  ते कोणत्याही पक्षात जातील तो पक्ष संपवून टाकतील, अशी टीका त्यांनी केली होती.