‘इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज ?’, शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषि विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी कनेक्शन असल्याचा पुनर्विचार हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उच्चार केला आहे. कट्टर यांनी शनिवारी गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने या आंदोलनामध्ये खलिस्तानी सहभागी असल्याचा दावा केला आहे.

आमच्याकडे इनपुट आहेत की काही समाजकंटक या गर्दीमध्ये घुसले आहेत. आमच्याकडे त्याचे रिपोर्ट आहे. आत्ताच खुलासा करणे योग्य नाही. त्यांनी थेट घोषणाबाजी केली आहे. जे ऑडिओ आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी यांच्याबाबत स्पष्ट घोषणा देताना दिसत आहे. ते म्हणत आहे की इंदिरांना मारलं तर मोदी काय अवघड आहे. यावेळी मुख्यमंत्री खट्टर म्हणले.

पंजाब हरियाणा सरकार शेतकरी मुद्द्यांवरून आमने – सामने आले आहेत. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप सरकार शेतकऱ्यांना विरुद्ध शास्त्र उचलण्याचा आणि त्यांना भडकावण्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना खट्टर यांनी म्हटलं की कॅप्टन कोरोना काळात शेतकऱ्यांना भडकवत आहेत. त्यांचा जीव धोक्यात घालत आहे. यावर पुन्हा अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले नाही भाजप सरकारच कोरोना काळात शेतकरी विधेयक लागू करण्यात आले होते.

यावेळी कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले, की खट्टरजी मला तुमचे उत्तर ऐकून आश्यर्य वाटले. तुम्ही मला नाही तर शेतकऱ्यांना एमएसपीच्या मुद्द्यावर विश्वासात घ्या. तुम्ही त्यांच्या दिल्ली चलो मोर्चाच्या आधी माझ्याशी बोलायला हवं होतं. जर तुम्हाला वाटतं की मी शेतकऱ्यांना भडकवत आहे तर हरियाणाचे शेतकरीसुद्धा या आंदोलनात का सहभागी होत आहेत? असा सवालही कॅप्टन अमरिंदर यांनी विचारला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा निशाणा साधला.

You might also like