#Video : सेल्फी काढण्यासाठी पुढे आलेल्या युवकासोबत मुख्यमंत्र्यांनी केले ‘असे’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक राजकीय नेत्याचे चाहते त्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी धडपडत असतात. मात्र हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाबरोबर असा काही व्यवहार केला कि त्या तरुणाला राग आला नसेल तर बरे…त्यांनी त्या तरुणाला सेल्फी घेण्यापासून रोखण्याबरोबरच त्याचा हात जोरात झटकला. हरियाणातील कर्नाल येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असताना हा प्रसंग घडला.

याआधी देखील असे प्रसंग मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याबाबतीत घडले आहेत. यावेळी या कार्यक्रमात खट्टर लोकांना अभिवादन करत असताना हा युवक पुढे आला आणि तो प्रथम त्यांच्या पाया पडला आणि त्यानंतर तो सेल्फी घेऊ लागला असता मुख्यमंत्र्यांनी त्याचा हात झटकला आणि त्याला बाजूला केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माणसांनी त्या युवकाला बाजूला सारले आणि मुख्यमंत्री पुढे मार्गस्थ झाले.

दरम्यान, खट्टर यांचे हे वागणे काही पहिल्यांदा नाही, आगोदर देखील एकदा एक वृद्द दाम्पत्य त्यांच्याकड़े आले असता त्यांच्यावर देखील ते ओरडले होते. ते दाम्पत्य त्यांच्याकडे १९ लाखांच्या फसवणूकप्रकरणी तक्रार घेऊन आले होते.