संतापजनक स्टेचरवरच्या रूग्णाच्या कापलेल्या पायांनाच बनवली ‘त्यांनी’ उशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं. त्याचदरम्यान स्ट्रेचरवरून त्याला नेताना रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच उशी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. फरिदाबादेतल्या सिव्हिल रुग्णालयात मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार घडला आहे.

42 वर्षीय प्रदीप शर्मा बडखल उड्डाणपुलाच्या खाली रेल्वे ट्रॅकजवळ काम करत होते. त्याचदरम्यान त्यांचे पाय रुळात अडकले, प्रदीप यांनी रुळातून पाय बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच भरधाव ट्रेन आली आणि प्रदीप यांचे पाय त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले.

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचा प्रदीप बाबत मोठा हलगर्जीपणा दिसून आला आहे. प्रदीपला स्ट्रेचरवरून नेताना डॉक्टर आणि वॉर्डबॉयनं त्यांच्या पायांनाच उशी बनवली. प्रदीपचे दोन्ही पाय स्ट्रेचरवर उशीच्या स्वरूपात दिसत आहेत.

रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. रुग्णालयात तोकड्या सुविधा असून, रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक होतं. त्यावेळी जे शक्य होतं ते आम्ही केलं आहे असे सिव्हिल हॉस्पिटलचे कार्यवाहक अधीक्षक डॉक्टर विनय गुप्ता यांनी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like