हरियाणाचे काँग्रेसचे प्रवक्‍ता विकास चौधरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, १० गोळ्या मारल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणामधील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-९ मध्ये हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर ८ ते १० गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हादरवून सोडणाऱ्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर दोन हल्लखोरानी हल्ला केला. विकास त्यांच्या गाडीतून जिमला जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी घडली. ज्या वेळी ते जिममध्ये जाण्यासाठी उतरले त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत एकूण १० ते १२ गोळ्या झाडल्या. त्यांच्या छाती आणि गळ्यावर मोठया प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर एसएक्स-४ या गाडीतून आले होते. पोलिसांनी गाडी आणि हल्लेखोरांना शोधण्यासाठी दोन टीम तैनात केल्या आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी सध्या राज्यात जंगलराज असल्याची टीका केली. ‘सध्या जंगलराज सुरु आहे. कायद्याची कोणतीही भीती नाही. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

कोण आहेत विकास चौधरी

विकास चौधरी हे हरियाणामधील काँग्रेसचे प्रवक्ते होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फरिदाबाद विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्या गटाचे ते समर्थक होते.

https://twitter.com/ANI/status/1144110949420404736

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले