विनेश फोगाट, बजरंग, लक्ष्यला हरियाणा सरकारकडून इनाम 

चंदिगढ : वृत्तसंस्था

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला, हरीयाणा सरकारने ३ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचसोबत ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य शेरॉनलाही  १.५ कोटींचं इनाम घोषित करण्यात आलेलं आहे. तसेच विनेश फोगटला सरकारी नोकरी तसेच लक्ष्यला वर्ग-१सरकारी नोकरी देण्याचाही घोषणा करण्यात अली आहे. हरीयाणा सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

[amazon_link asins=’B078N5MBL9,B00ICCYF0E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c22a22c-a519-11e8-88ec-17f115601209′]
विनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-२ ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीसोबत विनेश आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर लक्ष्य शेरॉननेही पदार्पणातचं रौप्य पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या दिवशी बजरंगने जपानी प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत सुवर्णपदक पटकावलं होतं.