खुशखबर ! 22500 चे सोलर सिस्टम फक्त 7500 रूपयांना देतय सरकार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईपासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी नवीन योजना आणत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठीच हरियाणा सरकारने आता एक नवीन योजना आणली असून सोलर होम लाइटिंग सिस्टम नावाची योजना आणली असून राज्यातील सर्व जिल्ह्यात या योजनेद्वारे जवळपास ७० टक्के सबसिडी देण्याचा सरकारचा मानस आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या तसेच पात्र असणाऱ्या नागरिकांना १५० व्हॅटचे एक सोलर मोडयूल, 80 एएच -12.8 वोल्ट लिथियम बॅटरी, २ एलईडी लाइट, एक ट्यूबलाईट  आणि एक पंखा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे.

या व्यक्ती करू शकतात अर्ज 
१) ज्यांच्या घरात वीज नाही असे व्यक्ती
२) अनुसूचित जाति परिवार
३) दारिद्र रेषेखालील नागरिक
४) प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती
५) शहरातील महिला वस्तीत राहणारा मात्र घरात वीज नसणारा परिवार
६) परिवाराची प्रमुख महिला असलेला परिवार
७) ग्रामीण घरातील कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी

असा करा अर्ज
या योजनेत देणाऱ्या वस्तूंची किंमत २२ हजार ५०० रुपये असून हरियाणा सरकार यावर १५ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देत आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ यासाठी साडेसात हजार रुपये खर्च करण्याची गरज आहे.

हि कागदपत्रे आवश्यक
हरियाणा सरकारच्या या ‘मनोहर ज्योति होम लाइटिंग सिस्टम योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, दारिद्र रेषेखालील रेशनकार्ड, अनुसूचित जाति प्रमाणपत्र आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –