न्यायाधीशाची पत्नी अन् मुलाची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यायाधीश कृष्णकांतच्या पत्नी आणि मुलगा यांची हत्या करणारा आरोपी महिपाल याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर परमार यांच्या कोर्टाने त्याला शुक्रवारी साडेचार वाजता फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तीन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. नियमानुसार या शिक्षेची एक प्रत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पाठविली जाणार आहे. दरम्यान दोन्ही बाजूंनी शिक्षेसंबंधी जोरदार वादंग सुरु होता.

फिर्यादींनी कोर्टाकडे फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असता बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला होता की जाणीवपूर्वक गोळी चालविली गेली नव्हती तर तत्काळ कारणास्तव गोळ्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत ३०२ चा खटला चालविणे योग्य नाही. परंतु कोर्टाने बचावाच्या युक्तिवादास अमान्य केले.

१३ ऑक्टोबर २०१८ रोजी हिसार येथील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कृष्णकांत (सध्या अंबाला येथे कार्यरत) आणि त्यांची पत्नी रितू व त्यांचा मोठा मुलगा ध्रुव सेक्टर-४९ येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पेंटिंगवर फ्रेम चढवण्यासाठी पोहोचले होते. ते जेव्हा संकुलाबाहेर आले तेव्हाच गनमॅन महिपालने त्या दोघांवर गोळीबार केला. त्या दोघांचा मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान त्यांची पत्नी रितूचा मृत्यू १३ ऑक्टोबरच्या रात्रीच झाला, तर ध्रुवचा २३ ऑक्टोबर रोजी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी १५ डिसेंबर २०१८ रोजी आपला तपास पूर्ण केला, तर २७ डिसेंबर २०१८ रोजी न्यायालयात अहवाल दाखल केला. दरम्यान ९ जानेवारी २०१९ रोजी कोर्टाने हा आरोप निश्चित केला.

आरोपीच्या विरुद्ध आयपीसी ३०२ आणि २०१ च्या बरोबरच आर्म्स अ‍ॅक्ट चे कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात एकूण ८१ साक्षीदार होते. यापैकी ६४ जणांची साक्ष घेण्यात आली होती. तर तीन न्यायाधीशांनीही साक्ष दिली. अंतिम साक्ष या प्रकरणातील तपास अधिकारी आणि तत्कालीन सेक्टर -५० पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंदर सिंग यांची होती. दरम्यान महिपाल याने १६ डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडली होती, महिपालने सांगितले की कारमध्ये पेंटिंग ठेवताना ध्रुवला दुखापत झाली होती. याचा राग येऊन ध्रुवने त्याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मग गाडीची चावी मागितली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि ध्रुवने रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच हा प्रकार घडला.

महिपाल विरुद्ध सहा मुख्य पुरावे

एकूण ८१ साक्षीदारांपैकी दोन प्रत्यक्ष साक्षीदार होते.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये गोळी चालवताना दिसला.

बंदुकीवर देखील आढळल्या बोटांच्या खुणा.

घटना संदर्भात व्हायरल झाले होते व्हिडीओ.

कारच्या स्टेरिंगवर देखील होते हाताचे निशाण.

त्याच्या युनिफॉर्म वर असलेले रक्त हे ध्रुवच्या रक्ताशी झाले मॅच.

दरम्यान त्यानेच फोन करून न्यायाधीश कृष्णकांत यांना गोळी मारण्याची माहिती दिली. दरम्यान अनुराग हुड्डा आणि विशाल गुप्ता यांनी लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्यासाठी भूमिका साकारली, यासाठी सरकारी वकील म्हणून जिल्हा उपन्यायाधीश अनुराग हुड्डा आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ वकील विशाल गुप्ता यांनी विशेष भूमिका बजावली.

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे ट्रान्सफर्ट करण्यात आला होता पण सरकारी वकिलांची जबाबदारी अनुराग हुड्डा यांच्याकडेच राहिली. जेष्ठ वकील विशाल गुप्ता यांनी म्हटले की या घटनेने सर्वांना हादरवून सोडले, रखवालदारच खुनी झाला. गनमॅन हा सर्वात जास्त विश्वासार्ह माणूस असतो. त्याने असे काही काम केले त्याच्याबाबत कुणीही विचार केला नसेल. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शुक्रवारी शिक्षेच्या चर्चेदरम्यान अशीच मागणी केली जाईल. उपजिल्हा न्यायाधीश अनुराग हुड्डा म्हणाले की, दोषीला फाशी मिळावी यासंदर्भातील चर्चेदरम्यान कोणत्याही टप्प्यात कोणतीही उणीव सोडली जाणार नाही.