काय सांगता ! होय, ‘कोरोना’ लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना ‘कोरोना’ची बाधा

पोलीसनामा ऑनलाइन : नुकतीच कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली. या चाचणीचे स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे .ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याची विनंती केली.

ट्विटरद्वारे नेमकं काय म्हणाले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज “मी कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी”

विज यांनी घेतला होता ‘कोवॅक्सीन’चा डोस
आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या ‘कोवॅक्सीन’ या लशीची निर्मिती केली जात आहे. विज यांनी २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. हरियाणामध्ये त्याच दिवशी (२० नोव्हेंबर) रोजी ‘कोवॅक्सीन’ या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. हा डोस घेण्यासाठी अनिल विज यांनी स्वत:हून पुढे आले. चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं विज यांना सांगितलं गेलं होतं. परंतु, त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.