Lockdown : ‘लॉकडाऊन’ चालु असतानाच वादविवादानंतर पोलिसानं केला पत्नीचा ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : लॉकडाऊन दरम्यान दररोज पोलिसांच्या चांगल्या कामांचे कौतुक होत असतानाच हरियाणा येथील हिसारमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने खाकीवर डाग पाडणारे काम केले आहे. घरगुती वादामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीची निर्दयपणे हत्या केली. पोलिसांना शेजाऱ्यांकडून हत्येच्या या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी पोलिस जवानाला अटक केली आहे.

हत्येची खळबळजनक घटना हिसारच्या सिरसा रोड येथील आहे, जेथे हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील विक्रम हा पत्नीसह भाड्याच्या घरात राहतो. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीबरोबर कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. या दरम्यान, विक्रमचा आपल्या रागावरून ताबा सुटला आणि लोखंडी सळईच्या सहाय्याने पत्नीच्या डोक्यावर हल्ला केला. विक्रमचा हल्ला इतका जोरात होता की तेथे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात तिथेच खाली पडली आणि काही काळानंतर तिचा मृत्यू झाला. शेजार्‍यांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा कारवाईनंतर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. घटनेच्या काही काळानंतर पोलिसांनी आरोपी विक्रमलाही अटक केली.

हिसार शहरचे पोलिस प्रभारी विनोद कुमार यांनी सांगितले कि, गुरुवारी सकाळी पोलिस विक्रमने पत्नीची हत्या केली. पोलिस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. घरगुती वादामुळे त्याने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे.