‘त्यानं’ आधी चोरली ‘ती’ लस, ठेवायला गेल्यानंतर लिहीलं – ‘सॉरी, मला माहित नव्हतं कोरोनाच्या लशी आहेत’

पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्याने रुग्णालयातून चक्क कोरोना लसीची चोरी केली. परंतू दुस-याच दिवशी गुरुवारी (दि. 22) त्या चोरटयाने एका चहावाल्याकडे या लसी परत केल्या. तसेच त्यासोबत एक संदेश लिहिलेला पेपरही दिला. त्यावर सॉरी मला माहित नव्हत या कोरोनाच्या लसी आहेत, असे यावर लिहलेले होते. हरयाणातील जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून हा विचित्र प्रकार समोर आला आहे. दरम्यान चोराला रेमडेसिवीर चोरायची होती. परंतु त्याने कोरोनाच्या लसी चोरल्या असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप त्या चोराची कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र आता यावर आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी हा फोटो ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. चोरांनीही माणूसकी दाखवली असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे.

 

 

 

 

जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी मध्यरात्री कोरोना लसीचे काही डोस लंपास झाले होते. परंतु गुरुवारी सकाळी सिव्हिल लाईन पोलीस स्थानकाबाहेर असलेल्या चहावाल्याकडे बसलेल्या एका वृद्धाकडे तो चोर पोहोचला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती पिशवी वृद्ध व्यक्तीला देत त्यात पोलीसासाठी जेवण आल्याचे सांगितले अन् तिथून धूम ठोकली अशी माहिती जिंग पोलीसचे डिएसपी जितेंद्र खटकड यांनी दिली.

वृद्ध व्यक्तीने ज्यावेळी ती पिशवी पोलिसांना दिली. त्यावेळी त्यांना त्यात कोविशिल्ड लसीच्या 182 वाईल आणि कोवॅक्सिनचे 440 डोस दिसले. तसेच त्याच्यासोबत एक पत्रही सापडले. त्यात सॉरी मला माहित नव्हते. यात कोरोनाच्या लसी आहेत, असा संदेशही लिहल्याचे त्यांनी सांगितले आहे.