Lockdown : मुंबईत ‘ऑडिशन’साठी गेलेल्या मुलानं आजारी आईसाठी केला 1400 KM चा सायकल प्रवास

चारखी दादरी / हरियाणा : वृत्तसंस्था – एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तीन महिन्यापूर्वी मुंबईत आला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि तो मुंबईतच अडकला. दरम्यान घरून फोन आला आई गंभीर आजारी आहे. अशा परिस्थितीत घरी परतण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याला घरी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. अखेर त्याने ओएलएक्स वरून एक जुनी सायकल खरेदी करून तो आपल्या आईला भेटण्यासाठी घराच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. असे असतानाही तो निराश झाला नाही. आईला भेटण्याची इच्छाशक्ती त्याला पुढे घेऊन गेली. अखेरीस 16 व्या दिवशी तो दादरीला पोहचला. अनेक अडचणीतून मार्ग काढत त्याने 1400 किलोमीटरचे अंतर पार करून आईला भेटला.

चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला गेला
हरियाणाच्या चरखी दादरी येथील रंगकर्मी संजय रामफळ हा मुंबईहून चारखी दादरी येथे सायकलवरून घरी पोहचला. मात्र, दादरीला येताच त्याची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. संजय दवाखान्यातून थेट घरी पोहचला आणि आईला पाहिल्यावर त्याच्या मनाला शांती मिळाली.

संजयने सांगितले की, तीन महिन्यापूर्वी एका मोठ्या बजेट चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला गेलो होतो. अंतिम ऑडिशननंतर मी घरी येणार होता. मात्र देशात लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे आई आजारी असल्याचे फोनवर समजले. त्यामुळे आईला भेटायला दादरीला जायचेच असे ठरवले.

ओएलएक्सवरून जुनी सायकल खरेदी केली
लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने त्याने ओएलएक्सच्या माध्यमातून मुंबईत एक जुनी सायकल खरेदी केली. 11 एप्रिल रोजी त्याने मुंबई येथून दादरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. हा प्रवास सुमारे 1400 किलोमिटरचा होता. त्याने हे अंतर 16 दिवसात पार करून घरी पोहचला. प्रवासामधील बऱ्याच अडचणीबाबत संजयने सांगितले की, तो दररोज 80 ते 90 किलोमिटरचा प्रवास करत होता. यादरम्यान त्याने पोलिसांच्या नाकाबंदीला चुकवत कच्च्या रस्त्याने प्रवास केला. मधेच त्याची सायकल खराब झाली आणि पुन्हा जुनी सायकल खरेदी करून तो दादरी येथे पोहचला.

आईला भेटून आनंद झाला
रंगकर्मी संजय रामफळ याची चरखी दादरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. घरी पोहचल्यार आणि आईला पाहिल्यावर खूप आनंद झाला, असे संजयने सांगितले.