‘प्राण जाये पर वचन न जाये’ हाच आमचा संकल्प :  राजनाथ सिंह

वृत्तसंस्था – आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात आपण दिलेली सर्व वचने पूर्ण झाली आहेत की नाहीत अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वेळावेळी होत असते. त्यामुळं ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हाच आमचा संकल्प असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. हरियाणातील पंचकुला येथे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

https://twitter.com/ANI/status/1162997451504197640
जम्मू-काश्मीर मधून कलर ३७० हटविणार असल्याचे भाजपने लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान जाहिरनाम्यातून सांगितले होते. त्याची वचनपुर्ती मोदी सरकारने केली आहे. आम्ही दिलेली सर्व वचने पुर्ण करतो. कुठलेही आश्वासन अथवा वचन अपुर्ण राहणार नाही याची काळजी आम्ही घेतो. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत वेळावेळी आमच्याकडे विचारणा करत असतात. त्यामुळं भाजप दिलेल्या सर्व वचनांची पुर्तता करेल असा विश्वास देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like