धक्कादायक ! गर्भवती गर्लफ्रेंडसह केला विवाह, क्षण भराची ‘मजा’ अन् आयुष्यभराची ‘सजा’

चंदिगड : वृत्तसंस्था – समाजात अनेकदा प्रेमविवाह केला म्हणून जोडप्याला वाळीत टाकण्याचे प्रकार घडतात किंवा ऑनर किलिंगच्या नावाखाली त्यांची हत्यादेखील केली जाते. काही ठिकाणी त्यांचे प्रेम स्वीकारलेच जात नाही. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. हरियाणातील रेवाडी येथील ही घटना घडली आहे. या प्रकरणात या मुलाला आणि मुलीला तिच्या घरच्या नातेवाईकांमुळे सध्या आयुष्यभरासाठी जीवघेणी यातना मिळाली आहे. या घटनेत प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात या घटनेमुळे नैराश्य आले आहे.

विवाहापूर्वीच या जोडप्यामध्ये शारीरिक संबंध आल्याने ती युवती गर्भवती राहिली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहसोहळा देखील उत्तम प्रकारे पार पडला. यादरम्यान ती तरुणी तीन महिन्यांची गर्भवती होती. मात्र लग्नानंतर माहेरी गेलेल्या तरुणीच्या आयुष्यात वेगळेच संकट उभे राहिले. माहेरी गेल्यानंतर या तरुणीच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. त्याचबरोबर तिला पतीला भेटण्यापासून रोखण्यात आले.

त्यामुळे या तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी धाव घेतली आहे. ४ मार्च २०१९ रोजी त्यानं आपल्या प्रेयसीसोबत हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह केला. त्यानंतर ती तरुणी माहेरी गेली असता तिच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा सासरी जाऊ दिले नाही. त्यानंतर या तरुणाने पोलिसांत धाव घेत या विषयी तक्रार नोंदवली आहे. याआधी देखील त्याने विवाह केल्यानंतर हायकोर्टात सुरक्षा पुरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती.

तरुणाची पोलिसांत धाव

याविषयी तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे कि, लग्नानंतर त्याचे सासरी जाणे येणे चालू होते, मात्र त्यांच्या मनात असे काही विचार सुरु आहेत याची पुसटशी कल्पना देखील मला नव्हती. प्रेयसीच्या घरच्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता, मात्र प्रेयसी गर्भवती राहिल्याने आम्ही लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांपासून काही धोका नसल्याने भीती देखील कमी झाली होती. मात्र तिच्या घरच्यांनी गर्भपात केल्याचे पोलिसांच्या माध्यमातून कळाल्याचे देखील त्याने सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त

या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय