धक्‍कादायक ! शिक्षकांनी होमवर्क दाखवायला सांगताच विद्यार्थ्याने केले सपासप वार

सोनीपत (हरयाणा) : वृत्तसंस्था – शिक्षकांनी होमवर्क दाखवण्यास सांगितले असता विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या चाकूने शिक्षिकेच्या अंगावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना सोनीपत येथील भिगान गावातील श्री राम कृष्ण स्कूलमध्ये घडली. इंग्रजीच्या शिक्षिकेने मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत होमवर्क दिला होता. हा प्रकार सोमवारी शाळेतील ११ वीच्या वर्गात घडला असून जखमी शिक्षिकेवर उपचार सुरु आहेत.

मुकेश कुमारी (वय-४५) असे महिला शिक्षिकेचे नाव आहे. एक महिन्यानंतर हरियाणामध्ये सोमवारी शाळा सुरु झाल्या. मुकेश कुमारी यांनी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत दिलेल्या होमवर्कबाबत विचारत असताना त्यांनी एका मुलाकडे होमवर्कची वही मागितली. त्याने बरोबर आणलेल्या चाकूने त्यांच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेश कुमारी यांना शाळेतील इतर शिक्षकांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, शाळेतून पळून जात असताना विद्यार्थ्याला शिक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत मुकेश कुमारी यांनी सांगितले की, मुलांना होमवर्क दाखवण्यास सांगितले. त्यावेळी त्या विद्यार्थ्याने बॅगेतून चाकू काढून आपल्यावर सपासप वार केले. हा विद्यार्थी कधीच दिलेला होमवर्क करत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस उपअधिक्षक विरेंद्र राव यांनी सांगितले की, महिलेच्या वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका